जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा


संगमनेर :प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकी प्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार जनतेचा आहे.महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहीती जनतेपर्यत पोहचविण्याचे आवाहन करतानाच इच्छुकांची संख्या पाहाता यशासाठी एकटे पुढे जाण्यापेक्षा सर्वाना घेवून जाण्याचा सल्ला डाॅ सुजय विखे पाटील यांनी दिला.
येथील मालपाणी लॉन्स येथे संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील महायुती कार्यकर्त्यांचा मेळाव्याला मार्गदर्शन करताना डॉ विखे पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ भाजपाचे जेष्ठ नेते भीमराज चतर मंडल अध्यक्ष श्रीकांत गोमासे गुलाब भोसले रवींद्र थोरात डॉ अशोक इथापे शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात आरपीआयचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्याच्या सुरुवातीस साकुरविभागा तील बुवाजी खेमनार तसेच जिल्हाबँकेचे चेअरमन राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

डॉ. विखे पाटील म्हणाले, “काही जण विविध कारणांनी दूर गेले असतील, पण आपण सर्वजण संगमनेरच्या अस्मिते साठी एकत्र आहोत आणि राहू. संघटना त्मक निवडणुकीत कोणतीही व्यक्ती एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. पुढील दोन दिवसांत आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती स्थापन केली जाणार असून सर्व उमेदवारांच्या निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत आपण सर्वानी संघर्ष केला म्हणून मोठे यशआ.अमोल खताळ यांच्या माध्यमातून महायुतीला मिळाले.तालुक्यात विकास कामासाठी निधी उपलब्ध होत आहे.पण या कामांची माहीती जनतेपर्यत पोहचविण्याची जबाबदारी महायुतीच्या कार्यकर्त्याची असल्याची जाणीव डॉ सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना करून दिली.


जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भोजापूर चारीच्या कामाला ४४कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .लवकरच या कामाला सुरूवात होईल.साकूर भागासाठी उपसा सिंचन योजनेची अंमलबजावणी जलसंपदा विभाग करणार असून योजनेबाबतची माहीती साकूर भागातील शेतकऱ्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात असल्याची माहीती डॉ विखे पाटील यांनी दिली.विधानसभा निवडणुकीत पाण्याचे गांभीर्य लोकांनी अनेक सभामधूनसमोर आणले निवडणुक झाल्यानंतर सर्व परीस्थिती बदलल्याचे चित्र तुम्ही पाहीले आहे.
उमेदवारीचा निकष नेत्याच्या जनाधारा वर आणि कार्यावर आधारित असेल, केवळ नेत्याशी जवळीक किंवा रोज भेटीगाठीवर नाही. त्यांनी उदाहरण म्हणून आमदार अमोल खताळ यांचा उल्लेख केला आणि सांगितले की, “मी त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी ओळखतही नव्हतो, पण त्यांच्या कामाच्या वृत्तीवर मला विश्वास होता. म्हणूनच मी स्वतः मुंबईत जाऊन शिंदे साहेबांकडून त्यांच्यासाठी ए.बी. फॉर्म आणला. “आपण महायुती म्हणून लढायचे आहे. कारण आपल्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामान्य जनतेच्या अपेक्षा सर्वांत महत्त्वाच्या आहेत. चिन्ह काहीही असो, पण आपल्याला महायुती म्हणून एकजुटीने लढायचे आहे.”

संघटनात्मक निवडणुकीत जो त्याग करेल त्याचा सन्मान होईल. ज्यांना यावेळी तिकीट मिळणार नाही त्यांनीही निस्वार्थ भावनेने संघटनेसाठी काम करावे. पुढील काळात त्यांचा योग्य सन्मान केला जाईल आशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांनी प्रेमाने, आदराने आणि प्रामाणिकपणे काम करून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही महायुतीकडे आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत वर्षापुर्वी विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठी मागे उभे राहीलात आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याच पध्दतीने सर्व आगामी निवडणुकीत उमेदवार कोणी जरी असेल तरी महायुती म्हणून एक जुटीने काम करा
श्री अमोल खताळ
आमदार संगमनेर विधानसभा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!