बालदिनी बालकलाकार कार्तिक गवांदे याची स्तुत्य कलाकृती!
संगमनेर (प्रतिनिधी) –
संगमनेर येथील बालकलाकार कार्तिक अमोल गवांदे (इयत्ता ६ वी, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल) याने बालदिनानिमित्त पेन्सिल शेडमध्ये काढलेले सुंदर चित्र सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

१४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुलांच्या कल्पकतेला, निरागसतेला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले जाते.
कार्तिकने आपल्या कलाकृतीतून बालदिनाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे साकारले आहे. त्याच्या चित्रातील सूक्ष्म रेषांकन, समयसूचकता आणि कल्पकतेमुळे त्याच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्तिकच्या या कलाकृतीला पालक, शिक्षक तसेच चित्रकलेच्या चाहत्यांकडून भरभरून दाद मिळत असून, त्याच्या कलागुणांवर सर्वत्र स्तुतीचा वर्षाव होत आहे. बालकलाकार कार्तिक हा आपल्या कल्पकतेच्या जोरावर सतत नवनवीन चित्रे रेखाटत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत आहे.
