महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा खताळ यांची उमेदवारी दाखल
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजई श्रीमती सुवर्णा विठ्ठल राहणे( श्रीमती सुवर्णा संदीप खताळ ) यांनी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि महा युतीच्या समर्थकांसह नगराध्यक्ष पदा साठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्याकडे दाखल केला.
प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णाताई रहाणे खताळ म्हणाल्या की मागील विधानसभा निवडणुकीत तुम्ही सर्वांनी जो विश्वास ठेवला तोच विश्वास नगरपालिका निवडणुकीत सुद्धा ठेवून महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करूनशहराचा रखडलेलाविकास करण्यासाठी महायुतीला साथ द्या असे आवाहन त्यांनी मतदारांना केले
आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ म्हणाल्या की संगमनेर शहरातील पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न सोडून इतरही प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे तसा विधानसभानिवडणुकी मध्ये महायुतीवर विश्वास ठेवला तसाच विश्वास या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा महायुतीवर ठेवा आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून शहराचा रखडलेला विकास करण्यास आम्ही कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास सौ खताळ यांनी व्यक्त केला
यावेळी त्यांच्या समवेत महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


