संगमनेर (प्रतिनिधी) –

जनता नगर मधील जिजामाता गार्डन येथे संगमनेर सेवा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सर्व उमेदवारांचा कार्य परिचय त्यांनी करून दिला यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उमेदवार डॉ. सौ मैथिलीताई तांबे,मा.नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, किशोर पवार, नितीन अभंग, गजेंद्र अभंग, सौ सीमा खटाटे, भारत बोराडे, सौ अर्चना दिघे, सौरभ कासार, सौ शोभा पवार, सौ प्राची भानुदास काशीद ,किशोर हिरालाल पवार, सौ डॉ.अनुराधा निलेश सातपुते, सौ वनिता गाडे,सौ.मालती डाके,सौ. दीपाली पांचारीया, गणेश गुंजाळ, अमजद पठाण , श्रीमती विजया गुंजाळ, शकीलाबेग, नूर मोहम्मद शेख,सौ सरोजना पगडाल, शहा नवाज खान ,किशोर टोकसे,सौ. प्रियांका शहा, सौ. कविता कतारी ,शैलेश कलंत्री, सौ नंदा गरुडकर ,प्रसाद पवार, मुजीब खान पठाण ,नसीब मानो पठाण उपस्थित होते
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर शहराला विकासाची मोठी परंपरा आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. विना लाईट मुबलक व स्वच्छ पाणी संगमनेर शहरासाठी निळवंडे थेट पाईपलाईन योजनेद्वारे मिळत आहे. संगमनेर मध्ये विविध समाजाचे लोक अत्यंत बंधू भावाने एक परिवार म्हणून नांदत आहे. शहरात विकासातून वैभवशाली इमारती ,सुसंस्कृत वातावरण , विश्वासाची बाजारपेठ मेडिकल हब शैक्षणिक हब निर्माण झाले आहे याचबरोबर सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वामध्ये 35 गार्डन उभ्या राहिल्या आहे. कामे खूप केली या पुढील काळात व्हिजन संगमनेर 2.0 अंतर्गत संगमनेर शहराला आणखी प्राप्त करून द्यायचा आहे.

मागील चार वर्षात प्रशासक राज असल्यामुळे अनेक कामे रखडली याचबरोबर मागील एक वर्षापासून संगमनेर शहरात अत्यंत असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. गुंडागर्दी दहशत वाढली आहे. अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. संगमनेरचा बंधुभाव राजकारणासाठी काही लोक जाणीवपूर्वक मोडू पाहत आहे. तरुणांना भडकवले जात आहे. बाजारपेठ असतील झाली आहे. महिला असुरक्षित आहे. हे सर्व आपल्याला बदलायचे असून संगमनेर शहराला गत वैभव प्राप्त करून देण्याबरोबर सातत्याने जनसेवक म्हणून काम करणे हे नगरसेवकांचे काम असणार आहे.
संगमनेर सेवा समिती ही राजकारण विरहित असून शहरातील सर्व समाज घटक विविध संघटना विविध राजकीय पक्ष या सर्वांना विचारात घेऊन उच्चशिक्षित अनुभवी कार्यक्षम आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार दिले आहेत. यामध्ये 11 उमेदवार हे अनुभवी असून 20 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
यावेळी सर्व उमेदवारांचा कार्य परिचय त्यांनी करून या प्रसंगी शहरातील समाज घटकातील सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेर सेवा समितीला सिंह चिन्ह
महाविकास आघाडी व समविचारी पक्ष, विविध संघटना बिगर राजकीय पदाधिकारी या सर्वांच्या विचाराने संगमनेर सेवा समिती स्थापन केली असून अत्यंत चांगले उमेदवार दिले आहेत. निवडणूक आयोगाचे अत्यंत किचकट नियम असल्याने सर्वांना एक चिन्ह मिळावे याकरता संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून सिंह ही निशाणी मिळाले असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.
