निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश


लोणी दि.२५ प्रतिनिधी

निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण पाटील यांनी विभागातील अधिकार्यांना दिल्या.

उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री ना विखे पाटील यांची भेट घेतली.भाजपाचे जेष्ठ नेते सिताराम भांगरे सुनिता भांगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सद्यपरिस्थितीत अकोले तालुक्यातील शेतकर्यानी मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली आहे.पाऊसचा मोसम संपल्यापासून उच्चस्तरीय कालव्यांना पाणी सोडण्यात आलेले नसल्याची गंभीर बाब शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून उच्चस्तरीय कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!