विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी– काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणाऱ्यांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैव संग्राम भंडारे यांच्या कृतीचा निषेध संगमनेर (प्रतिनिधी)–वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना समवेत घेऊन जाणारा मानवतेचा विचार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी अशा कठीण काळात हा विचार पुढे नेण्यासाठी धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण दिली. विकास लवांडे यांच्यावरील झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया वारकरी विचारांचे पाईक तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. संत परंपरेचा समतेचा विचार सांगणारे विकास लवांडे यांच्यावर तथाकथित संग्राम भंडारे यांनी आळंदी येथे शाईफेक हल्ला केला या घटनेचा तीव्र निषेध करून मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे .मात्र या हल्ल्याला ते धीरोदत्तपणे सामोरे गेले आहे. संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले यांनी अशा कठीण काळात आपला विचार जोपासण्यासाठी धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण आपल्याला दिली आहे. हा विचार पुढे घेऊन जाताना पुरोगामी महाराष्ट्रात विचार मांडणाऱ्यांवर होणारे हल्ले हे चिंताजनक आहे. यापूर्वी प्रवीण गायकवाड, हनुमंत पवार यांच्यावरही असे हल्ले झाले. आणि आता विकास दादा लवांडे यांच्यावर ही हल्ला झाला आहे. झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर प्रतिवाद करायला त्यांना संधी आहे. ते सांगू शकतात की आमचे वारकरी विचार असे आहेत. आणि त्यांनी ते सांगितले पाहिजे. मात्र तसे न करता हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. दुर्दैवाने शासन त्यांना पाठीशी घालते आहे हे वाईट आहे. महाराष्ट्राच्या विचार झालेला धक्का लावणाऱ्यांना सरकारने पाठीशी घालत आहे. वारकरी संप्रदायातील सर्वांनी अत्यंत जागृतपणे या घटनेकडे अत्यंत जाणीवपूर्वक पाहिले पाहिजे. विचारातून प्रतिवाद करा. पण प्रतिवाद न करता, विचार न मांडता हल्ला करणे हे अत्यंत चुकीची पद्धत आहे . आणि अशा लोकांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैवाचे असल्याचे टीका मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे..
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी– काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणाऱ्यांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैव संग्राम भंडारे यांच्या कृतीचा निषेधसंगमनेर (प्रतिनिधी)–वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना…
भैरवनाथनगर ग्रामपंचायतीत ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
भैरवनाथनगर ग्रामपंचायतीत ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीरामपुर – प्रतिनिधी ग्रामपंचायत भैरवनाथनगर येथे नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने निपटारा व्हावा आणि गावकऱ्यांना शासनाच्या योजनांचा…
पालकमंत्र्यांवरील आरोपांवर महायुतीचा जाहीर निषेध
पालकमंत्र्यांवरील आरोपांवर महायुतीचा जाहीर निषेध संगमनेर (प्रतिनिधी) – अमृतवाहिनी शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी व करुले गावचे सरपंच बाळासाहेब आहेर यांनी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात केलेल्या आरोपांवर संगमनेर तालुका महायुती,…
करूले गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र; प्रशासनाच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ संतप्त
करूले गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र; प्रशासनाच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ संतप्त संगमनेर (प्रतिनिधी) – उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर तळेगाव प्रादेशिक योजनेअंतर्गत येणाऱ्या मौजे करूले गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून,…
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची राजहंस दूध संघाला भेट
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची राजहंस दूध संघाला भेट संगमनेर (प्रतिनिधी)–दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. दूध उत्पादनामध्ये भारत हा जगात प्रथम क्रमांकाचा देश असून महाराष्ट्रात देशामध्ये सहाव्या क्रमांकाने…
आमदार अमोल खताळ; पोलिस दलात निवड झालेल्या तरूणांचा सत्कार
पोलिस दलात स्थान मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आमदार अमोल खताळ; पोलिस दलात निवड झालेल्या तरूणांचा सत्कार संगमनेर/ प्रतिनिधी ग्रामीण भागातील युवकांनी कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर पोलिस दलात…
ड्राय डे’ला हरताळ; नादुर–शिगोटे लोणी मार्गावर खुलेआम मद्यविक्री, नागरिकांत संताप
ड्राय डे’ला हरताळ; नादुर–शिगोटे लोणी मार्गावर खुलेआम मद्यविक्री, नागरिकांत संताप संगमनेर (प्रतिनिधी) – १ मे महाराष्ट्र दिन निमित्त राज्यभर ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला असताना नादुर–शिगोटे लोणी रस्त्यावर काही हॉटेलांमध्ये…
गोदा ते नर्मदा जलयात्रेचा महेश्वर येथे भव्य समारोप; महाराष्ट्र-मध्यप्रदेश नाते अधिक दृढ
गोदा ते नर्मदा जलयात्रेचा महेश्वर येथे भव्य समारोप; महाराष्ट्र-मध्यप्रदेश नाते अधिक दृढ गोदा ते नर्मदा यात्रा महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेची-मंत्री बावनकुळे गोदा ते नर्मदा यात्रेतून जलसंवर्धानाचे मंधन झाले-ना.विखे पाटील महेश्वर…
जलसंपदामंत्र्यांच्या निर्देशानंतर दुपारी आढळा डाव्या कालव्याला सुटले पाणी
जलसंपदामंत्र्यांच्या निर्देशानंतर दुपारी आढळा डाव्या कालव्याला सुटले पाणी आ.अमोल खताळ यांच्या पत्रानंतर जलसंपदामंत्र्यांनी दिले जलयात्रेतूंच निर्देश संगमनेर प्रतिनिधी आढळा लाभ क्षेत्रात संगमनेर तालुक्यातील येणाऱ्या गावांमध्ये शेत पिकाला पाणी देण्यासाठी पाणी…
राजधर सदाशिव गोडगे यांना ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने सन्मानित
राजधर सदाशिव गोडगे यांना ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने सन्मानित संगमनेर (प्रतिनिधी) – साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमानिमित्त बहुजन ग्रामविकास सेवा संघाच्या वतीने आयोजित “आदर्श माता-पिता सन्मान सोहळा २०२६” उत्साहात पार…
