चिंचोली ग्रामस्थांकडून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता
संगमनेर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दिलेल्या यंत्रणेमुळे पिंपळे चारीतून चिंचोली गुरव येथील बेंदाच्या बंधार्यात पाणी आल्याने सर्व नागरिकांनी कारखाना व लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून जलपूजन केले आहे.
चिंचोली गुरव येथील बेदाच्या बंधार्यातील पाण्याची जलपूजन प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक संपतराव गोडगे, प्रताप सोनवणे, बाळासाहेब खिलारी, विलास मास्तर सोनवणे,राहुल सोनवणे,अनिल खिल्लारी,दौलत सोनवणे, महेश सोनवणे, खंडेराव सोनवणे, बाळासाहेब गोडगे, दत्तात्रय गोडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने जलपूजन केले. यावेळी बोलताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते बाळासाहेब थोरात यांनी या भागाला पाणी देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून कालवे मार्गी लावली त्यांच्या प्रयत्नातून निळवंडेचे पाणी दुष्काळी भागात आले आहे. आज मात्र श्रेय घेण्यासाठी दुसरे पुढे येत आहे ज्या लोकांचे कोणतेही योगदान नाही ते पाणी पूजन करत आहे. पिंपळे धरणातून चिंचोली गुरवला पाणी मिळावे याकरता कारखान्याच्या यंत्रणेने 24 तास मदत करून चारी खोदून पाणी आणले आहे. ज्या भागात पाणी नाही त्या भागात पाणी देण्यासाठी माजीमंत्री बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांनी आराखडा केला असून त्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
संपतराव गोडगे म्हणाले की, निळवंडे कालव्यातून पाणी देण्यासाठी कारखान्याच्या यंत्रनेने मोठी मदत केली आणि चिंचोली गुरव आणि देवकवठेला पाणी मिळाले. पिंपळे धरणातून दरवेळेस आपल्याला पाणी येत होते. काही मंडळीनी राजकारण करण्यासाठी आपल्याला पाणी मिळून दिले नाही मात्र कारखान्याच्या यंत्रणेने मदत केल्याने पाणी बेंदाच्या बंधाऱ्यात पोहोचले आहे.
तर विलास सोनवणे म्हणाले की, काही मंडळी पाणी पुजण्याचे फोटो प्रसिद्ध करत आहे. या लोकांनी पाणी आणण्यासाठी कोणतेही काम केले नाही. फोटो बाजी मध्ये ते पुढे आहेत. काम करा आणि श्रेय घ्या मात्र तुम्हाला कोणतेही काम करता येत नाही चांगल्या कामाला खोडा घालता येतो अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

