पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांचा पदभार; नितीन गायकवाड यांच्याकडून सन्मान व शुभेच्छा
संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे नवे पोलिस निरीक्षक म्हणून समीर बारवकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला. या निमित्ताने दलित मित्र व वडगांवपान गटातील उत्साही युवक कार्यकर्ते नितीन गायकवाड यांनी त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी गायकवाड यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत बारवकर यांना शुभेच्छा दिल्या. आठवले साहेब यांनी नितीन गायकवाड यांच्या माध्यमातून समीर बारवकर यांना भावी कारकिर्दीत सहकार्याचे आश्वासन देत यशस्वी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
संगमनेर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बारवकर साहेबांच्या अनुभवाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


