आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या जन्मभूमी दिशादर्शक फलकाचे भव्य उद्घाटन
हिवरगाव पावसा (प्रतिनिधी) :
आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या जन्मभूमीचे स्मरण जपत तयार करण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाचे उद्घाटन आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता हिवरगाव पावसा टोल प्लाझा, नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्ग येथे उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्रीकांत भालेराव – प्रदेश उपाध्यक्ष, आर.पी.आय. (आठवले), अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख तसेच अध्यक्ष, कला सम्राज्ञी पवळा कला मंच, यांनी हजेरी लावून या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
दिशादर्शक फलकाच्या उद्घाटनामुळे गावाच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव अधोरेखित झाला असून, नामचंद पवळा भालेराव यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.
