आपले गाव संगमनेरसाठी हजारो नागरिक रस्त्यावर एकवटले


संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या सांगता प्रसंगी सेवा समितीने आयोजित केलेल्या प्रचार रॅलीमध्ये संगमनेर मधील सुमारे 15000 नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी संगमनेर मधील मेन रोड बाजारपेठ संगमनेर बस स्थानकासह सर्व परिसर सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गजबज होऊन गेला अभूतपूर्व रॅलीमध्ये प्रचाराची सांगता हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

जाणता राजा मैदान येथून सुरू झालेल्या प्रचार रॅलीमध्ये महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात ,डॉ मैथिलीताई तांबे , मनीष मालपाणी यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले.

जाणता राजा मैदान, संगमनेर बसस्थानक ,मेन रोड, बाजारपेठ अशा सुरू झालेल्या रॅलीमध्ये संगमनेर शहरातील तरुण व महिलांची संख्या मोठी होती. सर्वत्र सिंहाचे फोटो आणि चेहऱ्यावर प्रचंड उत्साह मोठी गर्दी हे या रॅलीचे वैशिष्ट्य होते. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केले.

या रॅलीमध्ये बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, बाहेरील लोकांचा संगमनेरच्या प्रगतीवर डोळा आहे आणि ते संगमनेर मधील काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून येथील विकास मोडून पाहत आहे. रेल्वे पळवली आता संगमनेर शहरातील पाणी पळवण्याचा त्यांचा डाव आहे. आणि हे पाणी मिळवण्यासाठी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे याकरता ही नगरपालिका त्यांना ताब्यात पाहिजे. विकास करण्याची धमक ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असून बाकीचे फक्त घेण्यात व्यस्त आहे आणि यामुळे संगमनेर शहर मागील एक वर्षापासून अशांत झाले आहे आता संगमनेरकर एक म्हटले आहे आपल्या गावासाठी शहरासाठी एकवटले आहे. सेवा समिती पुढील पाच वर्षाचे व्हिजन घेऊन अत्यंत काटेकोरपणे काम करणार असल्याचे ते म्हणाले.

अभूतपूर्व आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या रॅलीमध्ये सुमारे 15000 नागरिकांनी सहभाग नोंदवला.

 

शिंदे सेनेची रॅली फ्लॉप

शिंदे सेनेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये नागरिकांनी सहभाग घेतला नाही ढोल ताशांचे चार पथक घेऊन सुरू झालेल्या या रॅलीमध्ये ग्रामीण भागातील युवक गोळा करून आणले मात्र त्यांनीही काढता पाय घेतल्याने डॉ. श्रीकांत शिंदे यांना मध्येच रॅली बंद करून काढता पाय घ्यावा लागला याचबरोबर नवीन नगर रोड येथे आयोजित केलेली सांगता सभा सुद्धा उपस्थिती अभावी रद्द करण्याची वेळ शिंदे सेनेच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!