आपणही सर्वसामान्य शेतकर्याचा मुलगा असल्याचे कृतीतून दिले दाखवून
संगमनेर प्रतिनिधी :
शेतकरी कष्टाला मान देणारा आणि जमिनीशी नाळ जपणारा राजकारणी नेता म्हणून ओळख असलेलेआमदार अमोल खताळ यांनी चक्क आपल्या गाडीतून खाली उतरून शेतकऱ्यांच्या हातातील गहू बियाण्याची टोकरी घेऊन स्वतः शेतात गहू फुकत आपण ही एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले
. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे सुदाम खताळ यांच्यानिवास स्थानी सांत्वन भेटीसाठी आमदार अमोल खताळ आले होते , सांत्वन भेट आटोपल्यानंतर आमदार खताळ माघारी परतत असताना सोमनाथ खताळ यांच्या शेतात गहू फुकण्याचे (पेरणीपूर्व प्रक्रिया) काम सुरू होते. परिसरातील शेतकऱ्यांनी आमदारांना आपल्या शेतात थोडा वेळ थांबा अशी विनंती केली शेतकऱ्यांच्या आग्रहास मान देत त्यांनी आपली गाडी थांबवली आणि कोणताही दिखावा न करता थेट शेतात प्रवेश केला.आणि सोमनाथ खताळ यांच्या हातातील गव्हाच्या बियाण्यांची टोपली स्वतः घेत आमदार अमोल खताळ शेतात उतरले आणि गहू फुकण्याचे काम स्वतःच्या हाताने सुरू केले.हा साधा पण अनोखा उपक्रम पाहून उपस्थित नागरिक थक्क झाले. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज आमदार असला तरी जमिनीशी असलेले नाते त्यांनी कधीही सोडले नाही, याची प्रचिती धांदरफळ खुर्द च्या शेतकऱ्यांन प्रत्यक्ष पाहायला मिळाली. त्यांच्या या साधेपणामुळे उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थ भारावून गेले.“आमदार असूनही त्या पदाचा अहंकार नाही. आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या कामात ते सहजतेने सामील झाले. हे दृश्य पाहून सगळेच अवाक् झालो.”
