आ.अमोल खताळ यांची सोशल मीडियावर बदनामी!


संगमनेर : प्रतिनिधी
सोशल मीडियाचा गैरवापर करून आमदार अमोल खताळ यांच्या विरोधात खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी ढोलेवाडी-गुंजाळवाडी येथील पंडित गुंजाळ यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, “संगमनेर व्यवस्था परिवर्तन” या नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पंडित गुंजाळ याने नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत आमदार अमोल खताळ यांच्याविषयी खोटी माहिती जाणीवपूर्वक प्रसारित केली. या पोस्टचा उद्देश आमदार खताळ यांची प्रतिमा खराब करणे हा होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे शहर पोलिसांनी गुंजाळ यांच्याविरुद्ध भा.दं.सं. कलम 499, 500, 505, 469 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 अंतर्गत अदखल गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरणात अनावश्यक तणाव निर्माण होऊ नये, तसेच योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!