संगमनेर मधील ईव्हीएम मशीनचे कॅमेरे बंद झाल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम


क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूम मधील कॅमेरे एक तास बंद, नागरिकांमध्ये संभ्रम वाढला

संगमनेर (प्रतिनिधी)–राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकी मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम मशीन हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहे मात्र या स्ट्रॉंग रूमवर नियंत्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे एक तास बंद झाल्याने शहरात मोठा संभ्रम निर्माण झाला असून सर्व उमेदवारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रा ग्रुप मध्ये संगमनेर नगरपालिका निवडणुकीतील एक ते पंधरा प्रभागांमध्ये झालेल्या सर्व निवडणुकांचे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहे. हे ईव्हीएम मशीन सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधी यांच्या साक्षीने बंद करण्यात आले आणि त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.

मात्र आज रविवारी हे सीसीटीव्ही कॅमेरे एक तास बंद झाल्याने सर्व नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे तातडीने संगमनेर सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये विश्वासराव मुर्तडक, किशोर पवार, महेश खटाटे, प्रवीण अभंग, अमित गुंजाळ, सौरभ कासार, सचिन सातपुते ,लाला खान पठाण, नूर मोहम्मद शेख,अमजद पठाण, सागर कानकाटे ,संदीप लोहे यांसह संगमनेर सेवा समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

रविवारी एक तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याचे निदर्शनात येतात कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम कडे धाव घेतली. यावेळी अनेक नागरिकांनी क्रीडा संकुलाच्या बाहेर बसून प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

ईव्हीएम मशीन आणि त्याची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असून सध्या देशांमध्ये आणि राज्यांमध्ये ईव्हीएम बाबत नागरिकांमध्ये पूर्णपणे संभ्रम आहे. त्यातच अशा घटना वाढल्याने आणखी दुजेरा मिळत आहे. एक तास सीसीटीव्ही कॅमेरा का बंद होते याचे समाधानकारक उत्तर मात्र मिळू न शकल्याने नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला .यानंतर प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले.

उमेदवार आणि नागरिकांच्या मागणीनंतरही ते ठाम उत्तर देऊ न शकल्याने सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे .या घटनेची तालुक्यात आणि जिल्ह्यात पडसाद उमटले असून ईव्हीएम बाबत असणारी शंका नागरिकांमध्ये आणखी गडद झाली आहे.

 

सत्ताधारी काहीही करू शकतात विश्वासराव मुर्तडक

  1. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी ईव्हीएम च्या जोरावर निवडणूक जिंकत आहे. त्यातच संगमनेर मध्ये एक तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद हा काय प्रकार आहे. हे प्रशासनाने सांगितले पाहिजे काही वेगळे करण्याचा दबाव तर प्रशासनावर नव्हता ना अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली असल्याचे माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!