नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गे करावी ही मागणी
संगमनेर ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी प्रेरणादायी आहे महाराजांचा जन्म हा किल्ले शिवनेरी येथे झाला असून नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गे गेल्यास पुढे जुन्नर तालुक्यातून जाते यामुळे शिवनेरी येथील ऐतिहासिक महत्त्व वाढणार असून हा मार्ग संगमनेर मार्गी करावा अशी आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.

विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत बोलताना आमदार तांबे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती प्रा.राम शिंदे हे होते तर शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोईर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे. महाराजांचा जन्म हा जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे झाला आहे. नाशिक – पुणे रेल्वे सिन्नर,संगमनेर,जुन्नर,नारायणगा
महाराजांचा इतिहास पाहण्याची रेल्वेमुळे राज्यभरातील नागरिकांना सुविधा होणारा असून याकरता नाशिक – पुणे संगमनेर मार्गे होणारा रेल्वे मार्ग हा अधिक सोयीचा आहे आणि म्हणून हा मार्ग संगमनेर वरूनच जावा अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. या मागणीचे महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांकडून अभिनंदन होत आहे.

संगमनेर मध्ये मोठे जन आंदोलन
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून नाशिक – पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे नियोजित झाली होती मात्र सत्ता बदली आणि रेल्वेचा पुणे पुलतांबा असा उलटा मार्ग झाला. संगमनेर मार्ग हा नैसर्गिक असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा अधिग्रहित झाल्या आहे. या रेल्वे मार्गामुळे व्यापार,शिक्षक आणि उद्योग व्यवसायात वाढ होणार असल्याने नव्याने प्रस्तावित झालेल्या नाशिक,शिर्डी,अहिल्यानगर,पुणे मार्ग रद्द करून संगमनेर मार्गेच रेल्वे व्हावी या मागणी करता सिन्नर,संगमनेर,नारायणगाव,अकोले
