लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत यशवंतनगर वैदुवाडी प्रवेशद्वाराचे लोकार्पण


काँग्रेस पक्ष कायम गोरगरिबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला– लोकनेते बाळासाहेब थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी)–यशवंत नगर वैदुवाडीसह परिसराकरता आपण सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या. या समाजाने शिक्षण घेऊन चांगली प्रगती साधली आहे. अत्यंत प्रामाणिकपणे नोकरी आणि व्यवसायात तरुण पिढी काम करत आहे .नव्या प्रवेशद्वाराने या नगराचे वैभव वाढणार आहे . काँग्रेस पक्ष हा कायम गोरगरीब जनतेच्या पाठीशी भक्कम उभा राहिला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य तथा मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

यशवंत नगर वैदुवाडी येथे स्वागत कमानीचे लोकार्पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले यावेळी समवेत सवरग्या शिंदे, युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष शुभम शिंदे,युवा नेते नितीन गायकवाड साहेबराव शिंदे ,मारुती गायकवाड, वसंत शिंदे, रमेश शिंदे, चेबु लोखंडे, यश लोखंडे, किरण लोखंडे, राहुल शिंदे, आकाश शिंदे ,निलेश शिंदे, अक्षय शिंदे, बाबाजी लोखंडे, सागर शिंदे ,शंकर गायकवाड, अध्यक्ष राजू शिंदे, उपध्यक्ष रवी शिंदे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी यशवंत नगर परिसरातील युवकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांची जंगी मिरवणूक काढून अभूतपूर्व स्वागत केले.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी भटक्या गोरगरीब समाजाच्या विकासासाठी पायाभूत योजना राबवल्या. काँग्रेस पक्ष हा नेहमी गोरगरिबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. हा समाज अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ असून कायम आपल्याला साथ दिली आहे

नोकरी व्यवसायामध्ये शिक्षणातून या समाजाने आपले स्थान बळकट निर्माण केले आहे. विचारधारा जोपासताना तरुणांनी गावाच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहिले पाहिजे मात्र काही लोक जातीभेद निर्माण करून तरुणांची दिशाभूल करत आहे.

संगमनेर तालुका आणि शहर आणि कधीही जातीय राजकारणाला थारा दिला नाही. संगमनेर तालुका हा आपला परिवार आहे. ही परिवाराची भावना प्रत्येकाने वाढीस लावली पाहिजे. आपली परंपरा आणि समृद्ध वाटचाल तरुणांनी जपावी असे आवाहन त्यांनी केले.

तर शुभम शिंदे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी कायम तालुका उभा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित पणे निकाल आला . तरीही लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब जनतेमध्ये राहील नवीन लोकप्रतिनिधी या मागे कोणी दिसत नाही. निधी आल्याच्या घोषणा ते करत आहे मात्र प्रत्यक्षात निधी आला नाही. गोरगरीब समाज हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी होता आणि यापुढे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

यावेळी गावातील जेष्ठ कार्यकर्ते व युवकांनी ही आपली मनोगते व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!