तळेगाव दिघे येथे भव्य मातृ–पितृ पूजन सोहळा : संतविद्वान व मान्यवरांची प्रतिष्ठित उपस्थिती


तळेगाव दिघे (संगमनेर प्रतिनिधी) –
ह. भ. प. वाळीबा महाराज भागवत आणि सौ. ताराबाई वाळीबा भागवत यांच्या स्मरणार्थ आयोजित मातृ–पितृ पूजन सोहळा दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 ते 6 वाजेदरम्यान कुबेर लॉन्स व मंगल कार्यालय, तळेगाव दिघे, संगमनेर–कोपरगाव रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

या सोहळ्यास राष्ट्रीय संत परमपूज्य रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य काशीकानंद महाराज, हरिभक्त परायण मदन महाराज वर्पे, महंत राघवेंश्वर गिरीजी महाराज, स्वामी दिनानाथजी महाराज – ऋषिकेश, हरिभक्त परायण दयानंद महाराज बांगर, हरिभक्त परायण गजानन महाराज जुनधरे, हरिभक्त परायण राजू महाराज पानगव्हाणे आदी संतश्रेष्ठी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री महेश सूर्यकांत ढवळे साहेब उपस्थित राहणार असून, महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब थोरात, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर संघाचे आमदार सत्यजीत तांबे, माननीय कमलाकर कोते, माननीय सौ. शालिनीताई विखे, अॅड. डी. आर. वामन यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणार आहे.

तसेच महाराष्ट्रभरातील प्रसिद्ध कीर्तनकार, गायनाचार्य व वादनाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, दुपारी तीन ते पाच या वेळेत कीर्तन केसरी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गिरी (वावीकर) यांचे प्रभावी हरिकीर्तन होणार आहे.

या भव्य सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन श्री अशोक रंगनाथ भागवत, श्री शरद वाळीबा भागवत, न्यायाधीश ममता राम वाळीबा भागवत, सौ. वैशाली वाल्मीक कदम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!